श्री दक्षिणामूर्ति मंदिर, महाल, नागपूर (१२५ वर्षे पुरातन मंदिर)

श्री दक्षिणामूर्तये नम:

भाविकांनी भारतवर्षात वेदवेदांताचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारे, आपल्या नागपूरातील श्री दक्षिणामूर्ति मंदिर शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. ऐतिहासिक राजमान्य धर्ममान्य देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे.

दिनांक १३ फेब्रुवारी १८९८ माघ शुध्द त्रयोदशीला काशीच्या सहस्त्र ब्राम्हणांच्या वेदघोषात अतिरुद्राच्या अधिष्ठानाने आपल्या नागपुरातील महाल विभागात श्री दक्षिणामूर्ति तसेच भगवती बाला त्रिपुरा सुंदरी यांची स्थापना झाली. लोकमान्य बाळगंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, आद्य सरसंघचालक प.पू.डॉ. हेडगेवार, प.पू. श्री गुरूजी, भगिनी निवेदिता, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पदस्पर्शान राष्ट्रकिर्ती झालेले तसेच संत गजानन महाराज, श्रृंगेरीपीठाचे शंकराचार्य अभिनव विद्यातिर्थ स्वामी, कांचीपीठाचे श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी व श्री जयेंद्र सरस्वती स्वामी, देवनाथ मठाचे मारोतीनाथ महाराज यांच्या चरणस्पशनि पवित्र केलेल्या या मंदिराचा ज्ञानमय गाभारा भक्तिच्या व ज्ञानाच्या नंदादिपाने अखंड तेवत आहे.

मंदिराचे संस्थापक रा.रा. श्री सद्‌गुरू नारायण महाराज यांनी घालून दिलेल्या पीठपरंपरेला त्यांचे सुपुत्र ह.भ.प. व्यंकोबा महाराजांनी किर्ती कळस चढविला, किर्लोस्करी गायकीने चौदा भारतीय भाषांमध्ये आसेतुसेतु पर्यंत वेदांताचा कीर्तन स्वरूपात प्रचार केला. त्यांचे दोन पुत्ररत्न म्हणजे श्रीमंत अग्निहोत्री बाबुराव महाराज व महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास. बाळशास्त्रींचे नाव न जाणणारा एकही तत्काली शोधूनही सापडायचा नाही. एकूण भारतभर प्रखर हिंदुत्वाचा प्रचार केला, अनेक पुस्तके लिहिली, पुढे चार पिढ्या जोपासल्या गेलेली परंपरा आजही अविरत सुरू आहे.

ज्ञान देणारा हा शंकराचा पहिला अवतार असून उजव्या हातात ज्ञानमुद्रा धारण केली आहे. दक्षिण हस्ताने ज्ञानमुद्रा धारण करून अमृता समान विद्या नामामृत माध्यमाने सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार या चार ब्रम्हर्षिना दिली म्हणून या शिवाच्या विग्रहाचे दक्षिणामूर्ति हे नाव प्रसिध्द झाले. “अपस्मार” नामक अदृश्य विदेही, अज्ञानी, तामसी स्वरूपाच्या राक्षस प्रवृत्तींना नष्ट केले आणि ज्ञानाची किर्ती पताका युगायुगे फडकविली.

आपल्या श्री दक्षिणामूर्ति स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळात अनेक वर्ष गायली जाणारी “रक्ष रक्ष ईश्वरा, भारता प्राचिना जनपदा” ही राष्ट्रीध्दाराची प्रार्थना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी श्री दक्षिणामूर्तिच्या सभामंडपात बसून रचून दिली हे विशेष. श्री दक्षिणामूर्ति मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्याने आपणही ऐतिहासिक मंदिराचे रस जाणून घेऊया !

अप्रमेयत्रयातीत निर्मल ज्ञानमूर्तये। मनोगिरां विदूराय दक्षिणामूर्तये नमः ।।

जो प्रमेयांच्या पलिकडे आहे सत्व रज तम या तीन गुणांच्या पलिकडे असलेल्या निर्मळ शांतमूर्ती अवतार धारण करणाऱ्या मनोरूपी वाणीने (मौनाने) महान अर्थ प्रगट करणाऱ्या ज्ञानदेवतेला म्हणजेच दक्षिणामूर्तिला माझा नमस्कार असो.

Translate »
× How can I help you?