Our History

।। श्रीः।।

श्री दक्षिणामूर्ति भगवान यांच्या कृपेने व सर्वांच्या सहभागाने मंडळ आपले १०५ वर्ष साजेर करीत आहे. ही आपल्याकरिता अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरीता समाजाचे संघटन व जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उत्सव देशात प्रारंभ केला व हेच व्रत आपल्या पूर्वजांनी शिरोधार्य मानून १९२० साली आपल्या मंडळाची स्थापना केली.

॥ श्री दक्षिणामूर्ति भगवान ॥

आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गणेश बाळाभाऊ शेट्ये यांनी आपल्या राहत्या घराच्या ओसरीत याची छोटीशी सुरूवात केली, त्याचे आज भव्य रूप आपण पाहतो आहे. संस्कृती व संस्कार संवर्धन या द्विसूत्रीवर मंडळ १०५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे, ज्यात राष्ट्र प्रेम, समाज जागृती व सामाजिक बांधीलकी उत्तरोत्तर वाढेल असे सर्व उपक्रम मंडळ करीत आहे.

आपल्या मंडळाला महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास, श्रीमंत बाबुराव देशमुख, गोविंदराव देशपांडे यासारख्या महनीय व्यक्तिंचा आशिर्वाद व सहवास लाभला आहे. आरतीनंतर म्हटल्या जाणारी राष्ट्रीय प्रार्थना हे मंडळाचे वैशिष्ठय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याची रचना केली आहे. या प्रार्थनेच्या ओळी रोमरोमात राष्ट्रप्रेम जागे करते.

दक्षिणामूर्ती गणेशोत्सवाची नागपूरची ओळख म्हणजे हा एक प्रबोधनकारी गणेशोत्सवत म्हणून ओळखला जायचा. या गणेशोत्सवाने नागपूरला गाजवणारे वादविवाद, परिसवांद दिले जो एक इतिहास बनला. या परिसवादाच्या मंचावर पत्रपंडित भाऊसाहेब माडखोलकर, कुलगुरू वि.भी. कोलते, ना. वसंतराव साठे, विदर्भवीर जांभुतराव धोटे, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अॅड. चंद्रशेखर माडखोलकर, सुमतीताई सुकळीकर, रामजीवन चौधरी, पं. बच्छराजजी व्यास, कॉ.ए.बी.बर्धन, टी.जी. देशमुख, गेव्ह आवारी अगदी अलीकडच्या काळात या व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी, मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, दयाशंकर तिवारी, जवाहर बढिये आणि डॉ. कुमार शास्त्री आदि दिग्गज वक्तयांना ऐकायला चौकात तुडूंब गर्दी व्हायची.

समाजापूढे थोर पुरुषांचे कार्य यावे उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज, स्वा.वि.दा. सावरकर, लोकमान्य तिळक, स्वामी विवेकानंद, डॉ.ए.पी.जे कलाम, गोंदवलेकर महाराज आदि शंकराचार्य इत्यादी देखावे मंडळाने सादर केले आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव मुळ उद्देशासह साजरा करण्याकरीता परमेश्वर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुबुद्धी व शक्ति देईल ही प्रार्थना.

या १०५ वर्षात साजऱ्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना तन-मन-धन पूर्वक आपला सहयोग व उपस्थिती प्रार्थनीय आहे

Translate »
× How can I help you?